कोर्सचे वर्णन :
- पी एल सी म्हणजेच प्रोग्रामेबल लॉजिक कंट्रोलर हा औद्योगिक क्षेत्रातील डिजिटल कॉम्प्युटर म्हणून ओळखला जातो.
- पी एल सी प्रोग्रामिंग चा अभ्यास करत असताना विद्यार्थी पी एल सी चे ऑपरेशन्स आणि प्रोग्रॅम कसा करायचा याची टेक्निक्स शिकतात.
- पी एल सी कोर्स अभ्यासामध्ये विद्यार्थी नंबर सिस्टीम, बाईट अँड वर्ड, पीएलसी प्रोग्रॅम लँग्वेज आणि सिम्पल लॅडर लॉजिक प्रोग्राम शिकतील.
- पी एल सी च्या सॉफ्टवेअर बरोबरच विद्यार्थी स्वतः प्रोग्राम लिहिणे, तो तपासणं आणि प्रॅक्टिकल्स द्वारे तो टेस्ट करणं हे शिकतात.
- राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्यांचे पी एल सी आणि ते वेगवेगळ्या इंडस्ट्रीमध्ये कशाप्रकारे वापरले जातात याची सुद्धा विद्यार्थ्यांना ओळख करून दिली जाईल.
- विद्यार्थ्यांमध्ये कौशल्य आणि गुणवत्ता वाढीबरोबरच त्यांच्या अंगभूत हुशारीचा संपूर्ण वापर कसा करता येईल हे देखील तपासले जाईल.
- इंडस्ट्रीमध्ये जेव्हा कोंणत्याही प्रक्रियेचं ऑटोमेशन केलं जातं, तेव्हा वेगवेगळे रोबोट्स व पीएलसी वापरले जातात. हे वापरत असताना पी एल सी आणि रोबोटिक्स यांचं प्रोग्रामिंग खूप महत्वाचं असतं, यावर पूर्ण ऑटोमेशन प्रक्रिया अवलंबून असते. ऑटोमेशन चा कोर्स करत असताना या सगळ्या बाबींची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात येते.
प्रमाणपत्र :
सर्टिफिकेट कोर्स इन ऑटोमेशन अँड पी एल सी (‘महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास मंडळ’)
कोर्सचे फायदे :
- हा कोर्स पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना पीएलसी आणि त्याचे प्रोग्रामिंग याचं संपूर्ण ज्ञान प्राप्त होतं.
- विद्यार्थ्यांना पी एल सी च महत्त्व आणि त्याच्यामध्ये तांत्रिक कौशल्य प्राप्त होत. त्याचसोबत इंडस्ट्री सेटअप आणि इंडस्ट्रीचे वेगवेगळे ॲप्लिकेशन याच्यामध्ये पीएलसी कसा वापरायचा याचं ज्ञान मिळतं.
- पी एल सी च कम्युनिकेशन आणि कंट्रोल प्रोग्रामिंग द्वारे कसं करायचं याचं ज्ञान विद्यार्थ्यांना मिळतं.
- इंजिनियर्स तसेच आयटीआय, 10 वी + एक वर्ष व्होकेशनल कोर्स, किंवा कोणत्याही इंजिनीरिंगशाखेची पदविका / पदवी पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांनी सदर कोर्स पूर्ण केल्यावर त्यांना प्रॉडक्ट किंवा प्रोसेस मॅन्युफॅक्चरिंग कंपन्यांमध्ये नोकरीची संधी मिळते.
- कोणत्याही उद्योगात उच्च उत्पादकता साध्य करण्यासाठी ऑटोमेशन हा मुख्य आधार आहे आणि अशा प्रकारे, पीएलसी प्रोग्रामिंग किंवा मेंटेनन्स करणाऱ्या टेक्निशियन / इंजिनिअरची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे.
- सेलेस्टीयलचा कोर्स करणाऱ्या विद्यार्थ्यांना इंटर्नशिप, जॉब याबरोबरच स्वतःचा उद्योग करणार असाल तर आवश्यक ते सर्व सहकार्य आणि मार्गदर्शन केले जाते.
विद्यार्थ्यांना होणारे फायदे :
- राज्य शासनाच्या महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास मंडळाचा सर्टिफिकेट कोर्स इन ऑटोमेशन अँड पी एल सी या कोर्सच शासनमान्य प्रमाणपत्र विद्यार्थ्यांना मिळतं.
- शासन मान्य सर्टिफिकेट मिळणार असल्याने विविध कंपन्यांमध्ये नोकरीसाठी प्राधान्य मिळतं.
- यासाठी संस्थेकडे इंडस्ट्रीमध्ये काम केलेले पंचवीस वर्षे अधिक अनुभव असलेले इंडस्ट्रियल तंत्रज्ञ आहेत. तसेच कोर्स शिकवणारे शिक्षक इंडस्ट्रियल ट्रेनिंगमध्ये पाच वर्षापेक्षा जास्तीचा अनुभव असणारे आहेत.
- हा कोर्स केलेले विद्यार्थी ऑटोमेशन संबंधित इंडस्ट्रीमध्ये नोकरी मिळण्यासाठी आवश्यक पात्रता धारण करतात.
कोर्स साठी आवश्यक शैक्षणिक पात्रता :
- कोणत्याही इंजिनीरिंगशाखेची पदविका / पदवी
- आय टी आय (इलेक्ट्रिक / इलेक्ट्रॉनिक / इंस्ट्रुमेंटेशन)
- आय एम सी पी / एम एम टी एम
- एच एस सी (व्होकेशनल) इन (इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक ग्रुप)
- १० वी + एक वर्ष संबंधित विषयाचा अनुभव
Course Features
- Lectures 0
- Quizzes 0
- Duration 24 week
- Language English
- Students 30
- Assessments Yes
Curriculum is empty